डॉ. तात्याराव लहाने हे महाराष्ट्रातील एक जागतिक ख्यातीचे नेत्रतज्ज्ञ, मानवतावादी आणि वैद्यकीय शिक्षणतज्ज्ञ आहेत. त्यांचा जन्म १९५७ मध्ये लातूर जिल्ह्यातील माकेगाव या छोट्याशा गावात झाला. बालपणीची गरीबी, आजारपण आणि किडनी ट्रान्सप्लांट अशा अनेक अडचणींवर मात करून त्यांनी जगातील सर्वाधिक डोळ्यांचे शस्त्रक्रियेचे रेकॉर्ड प्रस्थापित केले आहे.

ते आजवर १.७७ लाखांहून अधिक मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया आणि ३१,००० हून अधिक डोळ्यांचे इतर प्रकारचे शस्त्रक्रियेचे काम विनामूल्य केले आहे — विशेषतः ग्रामीण आणि गरीब रुग्णांसाठी. त्यांच्या या अथक कार्यामुळे २००८ साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

डॉ. लहाने यांनी मुंबईतील जे. जे. हॉस्पिटलचे अधिष्ठाता म्हणून कार्य केले असून, त्यानंतर ते वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे (DMER) संचालक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात भव्य नेत्र तपासणी शिबिरे, मोफत शस्त्रक्रिया शिबिरे आणि वैद्यकीय प्रशिक्षण कार्यक्रम राबवले गेले.

ते त्यांच्या सरळ स्वभाव, शिस्तप्रियता आणि जनसेवेसाठी असलेल्या कटिबद्धतेसाठी ओळखले जातात. डॉ. लहाने यांची जीवनगाथा ही सहानुभूती, कौशल्य आणि चिकाटीने अनेकांचे आयुष्य कसे बदलता येते याचे जिवंत उदाहरण आहे.

About Tyatyarao lahane

डॉ. तात्याराव लहाने यांचे सन्मान व पुरस्कार

पद्मश्री पुरस्कार (२००८)

भारत सरकारकडून वैद्यकिय क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाबद्दल दिला गेलेला भारताच्या सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक, जो भारतीय राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान केला जातो.

राजर्षी शाहू महाराज पुरस्कार

डॉ. तात्याराव लहाने यांना २०२० साली प्रतिष्ठित "राजर्षी शाहू महाराज पुरस्कार" प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार श्री शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट, कोल्हापूर यांच्या वतीने दिला.

समाज भूषण पुरस्कार

डॉ. तात्याराव लहाने यांना त्यांच्या अत्याधुनिक नेत्रचिकित्सा आणि सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील योगदानासाठी समाज भूषण पुरस्कार प्रदान झाला.

महात्मा फुले समता पुरस्कार

डॉ. तात्याराव लहाने यांना महात्मा फुले यांच्या १३o व्या पुण्यतिथीनिमित्त महात्मा फुले समता पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

स्वामी रामानंद तीर्थ पुरस्कार

डॉ. तात्याराव लहाने यांना २००४ साली नेत्रचिकित्सेत उत्कृष्टतेसाठी स्वामी रामानंद तीर्थ पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या कार्यामुळे अनेकांना दृष्टी मिळाली.

संपर्क

मुलुंड (पश्चिम), मुंबई

युनिट क्रमांक ३०६, तिसरा मजला, प्रभादेवी इंडस्ट्रियल इस्टेट, सिद्धिविनायक मंदिरासमोर, एसव्हीएस रोड, प्रभादेवी, मुंबई – ४०००२५.

सोमवार ते शनिवार
सकाळी ९:०० ते ४:००

+९१ ८१०४७ ३२४००

प्रभादेवी, मुंबई.

 युनिट क्र. ३०२, ३०३ आणि ३०४, मॅरेथॉन मोंटे प्लाझा, डि-विंग, मदन मोहन मालवीय रोड, मुलुंड (पश्चिम), मुंबई – ४०० ०८०.

सोमवार ते शुक्रवार
सकाळी ५:००  – ८:३०

+९१ ८०९७२ ३६९३९,
+९१ २२३५९९६६५३

गौरवशाली क्षणसंग्रह

© 2025 Tatyarao Lahane. All Rights Reserved. | Design and Developed By Gatitaa, Pune, MH, India.

Create your account